धवल कुलकर्णी
मध्यप्रदेशातील वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी एका वाघिणीच्या मृत्यूनंतर तिचे शव महाराष्ट्रातल्या वन खात्यातील काही लोकांनी मध्यप्रदेशच्या हद्दीमध्ये टाकल्याचा आरोप केला. यानंतर या घटनेबाबत दोन्ही राज्याच्या संबंधित खात्यांमध्ये मतभेद निर्माण व्हायची चिन्हे आहेत.
पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली शर्मिली वाघीण ही डिसेंबर २०१९ ला मृतावस्थेत आढळली होती. तिचा मृतदेह महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या खवासा येथे सापडला होता. शर्मिलीचा अधिवास म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला हा भाग. मागच्या आठवड्यात मध्यप्रदेशच्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी धामसिंह खंडाते नावाच्या एका महाराष्ट्र वनखात्याच्या कामगाराला अटक केली आणि असा दावा केला की झालेल्या चौकशीमध्ये आणि तपासामध्ये असे निष्पन्न झाले होते या वाघिणीचा मृत्यू नागपूर जवळील देवलापार परिसरात झाला होता. पण तिथे शो महाराष्ट्राच्या वन खात्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी मध्य प्रदेशातील खवासा वनपरिक्षेत्रात घेऊन फेकले होते. घटनेमध्ये महाराष्ट्राच्या वनखात्याचा एक डेप्युटी रेंजर जबाबदार असल्याचा संशय घेण्यात आला होता.
महाराष्ट्र वनखात्याने सुद्धा आपल्या पातळीवर या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि याबाबतची संबंधित कागदपत्र मध्यप्रदेश कडून मागवलेली आहेत.
मात्र वनखात्याच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने या घटनाक्रमाबाबत काही शंका उपस्थित केल्या. “असा दावा केला जातोय कि वाघिणीचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये कर वही गावाच्या नदीजवळ झाला. त्यानंतर त्या वाघिणीचा मृतदेह आमच्या काही मंडळींनी मध्य प्रदेशात नेऊन टाकला असाही आरोप आहे. मात्र आज-काल वाघाचा मृत्यू झाला तर ही माहिती लगेच समाजमाध्यमांमध्ये फिरू लागते आणि त्याच बरोबर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात. मृत्यूचे कथित ठिकाण हे गाव आणि मनुष्यवस्तीच्या जवळ तर आहेत त्याच वेळेला रस्त्याला ही लागून आहे. त्यामुळे एखाद्या वाघाचा मृतदेह पडला असताना आणि वन कर्मचाऱ्यांनी केशव उचलून अन्य ठिकाणी नेत असतानासुद्धा गावकऱ्यांना किंवा आसपासच्या लोकांना त्याचा सुगावा सुद्धा लागला नाही हे विश्वास ठेवायला अवघड वाटते,”असे हे ज्येष्ठ वन अधिकारी म्हणाले.
या अधिकाऱ्याने असेही नमूद केले की जर मृत वाघिणीला उचलून तिला मध्यप्रदेशात नेण्यात आले होते तर यामध्ये एकट्या-दुकट्या व्यक्तीचा समावेश असू शकत नाही. तो मृतदेह एखाद्या वाहनाने नेला असावा आणि ह्यात किमान पाच ते सहा जणांचा तरी समावेश असावा. ही माणसं कोण आहेत याचा आम्ही शोध घेत आहोत परंतु इतकी मोठी घटना होऊन सुद्धा याचा मागमूस कुणाला लागू नये ते विश्वास ठेवायला अवघड वाटतं.
मात्र अधिकारी म्हणाले की काहीही असलं तरीसुद्धा आम्ही आमच्या पातळीवर या घटनेची चौकशी करत आहोत आणि कोणीही अगदी तो वनखात्याचे कर्मचारी जरी असला दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई निश्चितच होईल.