राज्यभरात सोमवारी उत्साहात लक्ष्मीपूजन पार पडलं. या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी करताना राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. पालघरच्या वसईमध्ये चपलांच्या गोदामाला आग लागली होती. या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी गोदामाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वसई, विरार आणि नायगावमध्ये सहा ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः गोरेगाव येथे इमारतीच्या सातव्या मजल्याला आग

या शिवाय ठाण्यात पाच ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. फटाक्यांमुळे या आगी लागल्याची माहिती ठाणे मनपाने दिली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत मुंबईच्या गोरेगाव पूर्वमधील एका इमारतीच्या सातव्या मजल्याला आग लागली होती. रात्री साडे नऊच्या सुमारास लागलेली ही आग अथक प्रयत्नानंतर विझवण्यात आली. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. या आगीमुळे कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

“साहेब, तुम्ही दोनदा स्वप्नात आलात” असं कार्यकर्त्याने सांगताच शरद पवारांनी विचारला भन्नाट प्रश्न, म्हणाले…

दरम्यान, पुण्यातील औंध भागातील डीपी रोडवरील एका प्लॅटमध्येही आग लागल्याची माहिती आहे. उशीरा रात्री अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2022 several fire incidences in maharashtra due to bursting of firecrackers rvs
First published on: 25-10-2022 at 07:57 IST