भाजपाविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. आपचे अरविंद केजरीवाल, जनता दलाचे नितीश कुमार, राष्ट्रवादीचे शरद पवार तर, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याकरता बैठकसत्रांना सुरुवात केली आहे. दरम्यान, आम्हाला विरोधी पक्ष न म्हणता देशभक्त म्हणा, असा सल्लाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना दिला आहे. ते आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “राजदंडातील राजधर्माचे पालन होत नाही, नव्या राजेशाहीमुळे…”, ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

बिहारच्या पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत. याबाबत पत्रकारांनी आज संजय राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “आम्ही त्याला विरोधी पक्ष म्हणत नाही. देशभक्त म्हणतो. या देशावर हुकुमशाहीचं संकट येतंय. देशात लोकशाही, संविधानविरोधी काम सुरू आहे. त्यामुळे मोदींविरोधात देशभक्त एकत्र येत आहेत. आमचा संविधानाला विरोध नाही. समविचारी पक्ष पाटण्यात एकत्र येतील, नितीश कुमार पुढाकार घेत आहेत. ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहतील”, अशी माहिती संजय राऊतानी दिली.

भाजपा झेंडा मराठीचा झेंडा नाही

“भाजपाचा झेंडा फडकेल असं जे. पी. नड्डांपासून सर्व म्हणत असतील तर स्वतः शिवसेना म्हणणवणारे लोक तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत. भाजपाचा झेंडा मराठीचा झेंडा नाही. त्यांचा झेंडा व्यापारांचा आणि शेठजींचा झेंडा आहे”, अशीही टीका यावेळी संजय राऊतांनी केली.

मोदींनी पत्रकार परिषद घ्यावी

“सरकारला पाच वर्षे झाली. लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने सुरू केली. मागच्या नऊ वर्षांत आपण काय केलं, जनतेला यासंदर्भात माहिती देण्याकरता पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे. लोकांना प्रश्न विचारू द्या. राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊनही पत्रकार परिषद घेतली. शरद पवार, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे पत्रकार परिषद घेऊन बोलतात. पण पंतप्रधान मोदी जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत”, असा सवालही संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont call us opposition party call us patriots because sanjay rauts strange advice to journalists sgk
First published on: 31-05-2023 at 10:14 IST