लातूर: हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसेल अशी भीती हैदराबादच्या आयएसबी संस्थेतील सहाय्यक प्राध्यापक डॉ.अंजल प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पत्रकार परिषदेस पाशा पटेल उपस्थित होते.
अंजन प्रकाश म्हणाले जगभर हवामान बदलामुळे अनेक संकटे ओढवत आहेत. जगाचे तापमान २१०० पर्यंत दीड टक्क्यांनी वाढेल असे गृहीत धरले होते, ते 2025 सालीच दीड टक्क्यांनी वाढले असून 2050 पर्यंत ते तीन टक्क्यांनी वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे .हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसणार असून भारतातील भाताच्या उत्पादनात 10 ते 30 टक्क्याने तर मक्याच्या उत्पादनात 25 ते 70% घट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर अनेक ठिकाणी दुष्काळाची भीती आहे .संपूर्ण जगभरातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांपैकी एकट्या भारतात चौदा प्रदूषित शहरे आहेत. हवामान बदलाचा फटका आरोग्यालाही बसणार आहे. आपल्या देशातील कलकत्ता, व चेन्नई या दोन शहरातील तापमान दोन सेल्सिअसने वाढले आहे .40 टक्के शहरांमध्ये हे प्रमाण तीन ते पाच अंशाने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आपल्या देशाला 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे त्यामुळे या किनाऱ्यालगतच्या नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. वादळी वारे वाढतील, समुद्रात राहणाऱ्या जलचर प्राण्यांनाही हवामान बदलाचा फटका सहन करावा लागत असल्यामुळे माशांच्या प्रजननातही 25% घट होत आहे.
हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण जगातच चळवळ उभी राहते आहे भारतातही वेगाने काम होते आहे. वृक्ष लागवडीच्या संदर्भात महाराष्ट्राने चांगलाच पुढाकार घेतला आहे. उन्हा च्या तीव्रतेचा फटका अनेकांना सहन करावा लागत असून उष्माघातामुळे बळीची संख्याही वाढते आहे. हवामान बदलाचा धोका ओळखून नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे मत अंजल प्रकाश यांनी व्यक्त केले.