अलिबाग : शाळांची वेळ सकाळची असते, त्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही, याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण विभागाला केली आहे. मात्र राज्यपालांची सूचना योग्य असली तरी तिची अमंलबजावणी व्यवहार्य नाही असे मत शिक्षण संस्थाचालकांनी व्यक्त केले.

सकाळच्या सत्रातील शाळांमुळे विद्यार्थ्यांची झोप होत नाही हे म्हणणे योग्य असले, तरी शाळेची वेळ बदलणे अनेक ठिकाणी शक्य होणार नाही. उदाहरण द्यायचे झाले तर शहरी भागात ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. त्या ठिकाणी सकाळच्या आणि दुपारच्या अशा दोन सत्रात शाळा चालवल्या जातात. विद्यार्थ्यांच्या सत्रात माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी तर दुपारच्या सत्रात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बोलविण्यात येते. दोन्ही सत्रातील शाळा किमान पाच तास चालवणे शिक्षण विभागाच्या धोरणानुसार बंधनकारक असते. अशा वेळी शाळांची वेळ बदलायची कशी असा प्रश्न शिक्षण संस्था चालकांना पडला आहे.

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : विधानसभेत विरोधकांचा सभात्याग, आरोग्य प्रश्नांवरून सभागृहात खडाजंगी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या शाळांची विद्यार्थी संख्या दोन हजारहून अधिक आहे, त्या शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी किमान साठ वर्गखोल्यांची असते. शाळेत येवढ्या वर्ग खोल्या उपलब्ध नसतात. त्यामुळे दोन सत्रात शाळा चालवणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे राज्यपालांची सूचना योग्य असली तरी तिची अमंलबजावणी करणे व्यवहार्यतेच्या पातळीवर शक्य होणार नसल्याचे मत अलिबाग येथील दत्ताजीराव खानविलकर एज्यूकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी केली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने राज्यपालांच्या सूचनेचा चार करताना निर्णयाची अंमलबजावणी करतांना येऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणींचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.