भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीवर भाष्य केलं होतं. शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असं उदयनराजे म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर दिलं आहे. उदयनराजे यांनी आधी राजकारणातून निवृत्त व्हावं, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उदयनराजे यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, “केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिकाची व्याख्या लक्षात घेतली तर ६० वर्षांवरील जेवढे लोक असतील ते सर्वजण सेवानिवृत्त होतात. त्यामध्ये उदयनराजेही बसतात. त्यामुळे उदयनराजेंनी एक ठरवलं पाहिजे की, आता मी ज्येष्ठ नागरिक झालो आहे, आता राजकारणात मलाही रस नाही. शरद पवारांना जसं राजकारणातून निवृत्त व्हा, अशा सूचना दिल्या जातात. तसेच ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नेत्यांना राजकारणातून निवृत्त करण्याबाबत योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा.”

हेही वाचा- असदुद्दीन ओवेसींकडून इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख; पंतप्रधान मोदींचं नाव घेत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदयनराजे नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवारांच्या निवृत्तीवर भाष्य करताना उदयनराजे भोसले म्हणाले, “माझी निवडणुकीची हौस भागली आहे. बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली समजलं नाही. शाळा आणि कॉलेज कधी संपलं, हेही कळालं नाही. आता कुठेतरी प्रत्येकानं थांबलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय असते. तसे, राजकीय नेत्यांनाही लागू केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक राजकीय नेता लोकांचा आग्रह असल्याने उभं राहिलो, असं सांगतात. शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं. कारण, मुख्यमंत्री आणि केंद्रातही अनेक वर्षे ते मंत्री राहिले आहेत. अनेकांना वाटतं शरद पवारांकडून मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं, मला योग्य वाटतं.”