धवल कुलकर्णी
लवकरच तुमचा राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून होणारा प्रवास हा प्रदुषणमुक्त पद्धतीने होऊ शकेल. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी लवकरच आपल्या ताफया मध्ये विजेवर चालणाऱ्या बसेसचा समावेश करू शकते.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार एस टी महामंडळ तर्फे याबाबत विचार होत आहे. मात्र याबाबत आम्हाला इलेक्ट्रिक बस साठी व्यवस्था करावी लागेल जसे की चार्जिंग आणि इतर पायाभूत सुविधा. या सुविधांसाठी किती खर्च होईल हे आम्ही तपासून पाहू. त्याच वेळेला या बस सुरुवातील या मोठ्या शहरांमध्ये सुरू करून नंतर त्यांचा व्याप इतर ठिकाणी वाढवावा का? हेही बघावे लागेल, असे परब म्हणाले.
मात्र आम्ही इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार करत आहोत कारण याच्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि एसटी महामंडळाला झपाट्याने वाढणाऱ्या इंधनाच्या किमती चां फटका बसणार नाही असे त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात साधारणपणे 18,500 च्या आसपास गाड्या आहेत. यामध्ये लाल डब्यापासून एशियाड ते शिवशाही आणि शिवनेरी चा समावेश होतो. साधारणपणे 1.02 लाखाच्या आसपास कर्मचारीवृंद असलेली एसटी दिवसाला साधारणपणे 67 लाख प्रवाशांची वाहतूक करतो