:छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने बुधवारी रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. बॉम्बचा शोध घेण्यासाठी बॉम्बशोधक पथक, पोलीस, अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, हा अग्निसुरक्षेसंदर्भातील कार्यशाळेच्या (मॉक ड्रिल्स) सराव चाचणीचा प्रकार असल्याचा उलगडा झाल्यावर गोंधळ शमला.

हेही वाचा- हसन मुश्रीफ यांच्या घरावर तब्बल १२ तास छापेमारी! चौकशीत ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?

संकटकालीन बचाव प्रशिक्षण वेळोवेळी घेतले जाते. यासाठी आज छत्रपती शाहू महाराज टर्मिनसची निवड करण्यात आली होती. येथे बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. बॉम्बशोधक पथक, पोलीस, अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. बॉम्बचा तपास करण्यासाठी संपूर्ण रेल्वे स्टेशन मोकळे करण्यात आले होते. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पुढे काय होणार याची उत्सुकता ताणली होती. अखेर हा मॉक ड्रिल्सचा सराव चाचणी प्रकार असल्याचा उलगडा झाल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.