भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांची आज जयंती. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशभरात ‘अभियंता दिन’ म्हणजेच ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या यांचा जन्म जरी आंध्र प्रदेशमध्ये झाला असला तरी त्यांचे महाराष्ट्राशी आणि विशेष करुन धुळे शहराशी विशेष नाते होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या याच खास नात्याबद्दल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

> आंध्र प्रदेशातील कोलार जिल्ह्यातील मोक्षगुंडम् हे त्यांचं जन्मगाव

> विश्वेश्वरय्यांच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ धुळय़ात झाली. १८८४ ते १९०८ पर्यंत ते मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) सहाय्यक इंजिनीअर होते. तेव्हा तब्बल १६ महिने विश्वेश्वरय्या धुळय़ात होते.

> धुळय़ात पीडब्ल्यूडीच्या जुन्या कार्यालयातील एका खोलीत ते बसत. डेडरगाव तलाव ते धुळे शहर पाइपलाइन, दातर्ती येथील सायफन्स, पांझरा नदीवरील १८८ फड बंधारे ही धुळय़ातील त्यांची मुख्य कामे.

> जलसंपदेतील देदीप्यमान बांधकामांमध्ये कावेरी नदीवरील कृष्णराज सागर धरण, भाटघर धरण, अ‍ॅटोमॅटिक गेटस्सह खडकवासला धरण, तुंगभद्रा नदीवरील धरण या बांधकामांचा समावेश होतो

> म्हैसूर आणि वृंदावन गार्डन ही विश्वेश्वरय्यांच्या यांच्याच कल्पनेतून साकारली आहेत

> राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते १९५५ साली त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला

> धुळ्यामध्ये ‘भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या स्मृती समिती’ने विश्वेश्वरय्या स्मृती संग्रहालय उभारले आहे. यामध्ये विश्वेश्वरय्या यांचा जीवनप्रवास आणि काही खास फोटो पहायला मिळतात. हे संग्रहालय साकारण्यासाठी मुकुंद धाराशिवकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

(माहिती लोकप्रभाच्या २८ नोव्हेंबर २०१४ च्या अंकामधून साभार)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineers day sir m visvesvaraya and dhule city connection scsg
First published on: 15-09-2020 at 11:36 IST