डोंबिवली – नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त कल्याण, डोंबिवलीत मंगळवारी सकाळपासून उत्साहाला उधाण आले होते. मुख्य वर्दळीचे रस्ते मिरवणुका, त्यामधील विविध प्रकारचे संदेश देणारे चित्ररथ यांंनी गजबजून गेले होते. चौकाचौकात ढोल ताशांचा गजर आणि दूरचित्रवाणीवरील कलाकारांंच्या स्वागत यात्रेमधील उपस्थितीने स्वागत यात्रेची रंंगत वाढली होती.

लोकसभा निवडणुकीचा काळ असल्याने स्वागत यात्रेत राजकीय मंडळींनीही उपस्थिती लावली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद पाटील, महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आचारसंहिता लागू असल्याने कोणत्याही विषयावर भाष्य न करता सामान्य नागरिकांप्रमाणे ही मंडळी स्वागत यात्रेत सहभागी झाली होती.

indices Sensex and Nifty fall for fifth session
मंदीवाल्यांच्या माऱ्यातही ‘सेन्सेक्स’ ८० हजारांवर तगून! सलग पाचव्या सत्रात निर्देशांकांत घसरण
Sangli, Theft, flats, Sangli news,
दिवसाउजेडी दोन सदनिकांतील सात लाखांचा ऐवज लंपास
Tuljabhavani temple, file missing case,
तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाळ प्रकरण : जुना अहवाल दडवून नवी चौकशी समिती, संशयिताच्या हाती मंदिर आस्थापनेचा कारभार
Chandrapur Jail, Hindu-Muslim unity,
‘हे’ कारागृह दोन दिवस राहते सगळ्यांसाठी खुले, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
Terror, youth, swords, Aajdepada,
डोंबिवलीतील आजदेपाड्यात तलवारी घेऊन तरुणांची दहशत
uttar pradesh stampede at religious event
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ८७ जणांचा मृत्यू; तीन चिमुकल्यांसह महिलांचाही समावेश
amarnath yatra begins amid tight security
प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ
chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!

हेही वाचा – “जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!

डोंबिवलीत श्री गणेश मंंदिर संस्थान आयोजित स्वागत यात्रेला भागशाळा मैदान येथून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्जवल निकम यांच्या उपस्थितीत श्री गणेशाचे पूजन करून पालखी सोहळ्याला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला. यावेळी संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त राहुल दामले, वैद्य विनय वेलणकर, प्रवीण दुधे, सनदी लेखापाल सुहास आंबेकर, संयोजक दत्ताराम मोंडे उपस्थित होते.

रामल्लाचा जयघोष स्वागत यात्रेत सुरू होता. भजन मंडळे यात्रेत सहभागी झाली होती. पर्यावरण संवर्धन, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ यात्रेत सहभागी होते. निवडणुकीचा कालावधी असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीचे आवाहन चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात आले होते. मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन बाहेरगावी पर्यटनासाठी न जाता तो हक्क प्रथम अंमलात आणा, असे आवाहन केले जात होते.

रस्त्यांमधील चौकचौकात ढोल, ताशा पथके स्वागत यात्रेचे स्वागत करत होती. विविध गटातटात असलेली राजकीय मंडळी स्वागत यात्रेनिमित्त एकत्र आल्याने एकमेकांंना शुभेच्छा देत होती. बालगोपाळ मंडळी, नवतरूणी, महिला पारंपारिक वेशात स्वागत यात्रेत सहभागी झाली होती. फडके रोडवर संस्कार भारतीने काढलेल्या देखण्या रांगोळ्या पाहण्यासाठी झुंबड उडाली होती. फडके रोड भाविकांनी फुलून गेला होता. कलाकारांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरून उपस्थितांचे मनोरंजन केले. गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

कल्याणमध्ये जल्लोष

कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने भारतीय वैद्यकीय शाखा कल्याण शाखेच्या सहकार्याने यावेळी काढण्यात आलेल्या कल्याणमधील स्वागत यात्रेत नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. ढोलताशांंच्या गजरात सिंडीगेट येथून स्वागत यात्रेला सुरूवात झाली. चित्ररथ, घोडेस्वार, लेझिम पथके, भजने गात नागरिक स्वागत यात्रेत आनंदाने सहभागी झाले होते.

अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्याने राम नामाचा जयघोष यावेळी केला जात होता. भारत मात की जयचा घोष सुरू होता. लोकसभा निवडणुकीचा हंंगाम विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मतदारांना मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. पालिकेतर्फे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीची माहिती स्वागत यात्रेतून दिली जात होती. महसूल अधिकारी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते.

हेही वाचा – धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निशिकांत बुधकर, समन्वयक डाॅ. प्रशांत पाटील, आयएमए कल्याण शाखेच्या अध्यक्षा डाॅ. इशा पानसरे, मिलिंद कुलकर्णी, भिकू बारस्कर, निखिल बुधकर, अतुल फडके आणि सहकारी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. फडके मैदानात येथे स्वागत यात्रेचा समारोप झाला.

नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त निवीन विचार, नवीन धोरणांची गुढी उभारली पाहिजे. निवडणुकीचा काळ आहे. प्रत्येकाने लोकशाहीने दिलेला आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. आसुरांशी लढण्याचा ताकद आपणास नववर्षानिमित्त मिळो. ॲड. उज्जवल निकम, ज्येष्ठ विधिज्ञ.