धानोरा उपविभागातील कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या चारवाही जंगल परिसरात मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी जमिनीत पुरून ठेवले स्फोटके शोधण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. यात मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य देखील हस्तगत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- वाशीम : ‘स्वाभिमानी’कडून अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’, पोलिसांना…

फेब्रुवारी ते मे या कालावधीत नक्षलवादी ‘टीसीओसी’ (टॅक्टीकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडवून आणतात. याच उद्देशाने त्यांनी कटेझरी-चारवाही जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटके पुरून ठेवली होती. मंगळवरी दुपारच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाने अभियानदरम्यान स्फोटके निकामी करीत नक्षल साहित्य जप्त केले. यात २ जिवंत ग्रेनेड,२ ग्रेनेड फायर कफ, १८ वायर बंडल, ५ ब्लास्टींग स्टिल डब्बे, १ प्लास्टिक डबा (टुल किटसह), ४ वायर कटर, ७ ग्रेनेड माऊंटींग प्लेट, १ लहान लोखंडी आरी, २० नक्षल पुस्तके, ७ टु-पीन सॉकेट आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. यावेळी बीडीडीएस पथकाने जप्त स्फोटके निकामी केले. जवानांनी केलेल्या कारवाईचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosives buried by naxalites seized by gadchiroli police force ssp 89 dpj
First published on: 14-02-2023 at 20:10 IST