लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : विधानसभा निवडणुकीत सरकारने दिलेल्या आश्वासने पूर्ण करून घेण्यासाठी महाराष्ट्रभर कर्जमुक्ती अभियान राबवणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितले.

संघटनेची बैठक शुक्रवारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पाटील म्हणाले, १९ फेब्रुवारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पासून १९ मार्च महाराष्ट्रातील सरकारच्या धोरणाचे बळी ठरलेले शेतकरी साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिन पर्यंत शेतकरी संघटने कडून कर्जमुक्ती अभियान चालू करण्यात आले आहे.

या कालावधीत जनजागरण करून दि. १९ मार्च रोजी विभागीय आयुक्त पुणे येथे कर्जमुक्ती अभियानाचा समारोप करण्यात येईल. अभियानामध्ये शेतीमालावरील निर्यात बंदी हटवावी, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांची सर्व कर्जातून मुक्तता करावी, शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी, दुधासह सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. उसाला प्रतिटन ५ हजार रूपये भाव मिळावा, अथवा कारखान्यामधील अंतराची अट रद्द करण्याची यावी आदी मागण्या असल्याचे पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीस नंदकुमार पाटील, शंकरराव मोहिते, वंदना माळी, लक्ष्मण पाटील, केतन जाधव, इसाक सौदागर, परशुराम माळी, राजू बिरनाळे, शिवाजी दुर्गाडे, शिवाजी पाटील, चंद्रकांत रास्ते, बलराम बाबर, प्रताप घोरपडे, हरी कोळी आदि प्रमुख उपस्थित होते.