साप आणि मुंगस म्हणजे एकमेकांचे कट्टर वैरी. ते आमने-सामने आले की जीवघेण्या झुंजीचा थरार अनुभवायला मिळतो. असाच अनुभव अकोले जिल्ह्यात पाहायला मिळाला. कोब्रा जातीचा साप आणि मुंगूस एका शाळेजवळील रस्त्यावरच एकमेकांशी भिडले. हा थरार शालेय विद्यार्थ्यांनीही अनुभवला. या झुंजीचा थरार पाहून शाळेतील विद्यार्थ्यांच्या काळजाचे ठोके चुकणारा होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंगूस आणि साप यांच्या दोघांचंही शत्रूत्व सर्वश्रुत आहे. हे दोघेही एकमेकांचे ‘जानी दुश्मन’ समजले जातात. अन्नसाखळीतील हे प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात प्राणघातक झुंज होणारच यात शंका नाही. अशाच एका झुंजीचा थरार बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील यशोदाबाई इंगळे विद्यालय परिसरात पाहायला मिळाला.

या विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व काही ग्रामस्थांनी देखील ही लढाई पाहिली. या झुंजीत तीन मुंगुसे होती आणि नाग मात्र एकटाच होता. अशा विषम वाटणाऱ्या लढाईत एकाच मुंगसाने नागाला जेरीस आणलं. अखेर या लढाईत मुंगसाने नागाचा फणा पकडून त्याला ठार केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय घडलं?

नाग आणि मुंगसामधील ही झुंज तब्बल अर्धा तास सुरू होती. या काळात विषारी नागाने अनेकदा आपला फणा काढून मुंगसावर हल्ला केला. मात्र, चपळ मुंगसाने हा हल्ला चुकवत योग्य संधीची वाट पाहिली. अखेरीस मुंगसाने विषारी नागाचा फणा आपल्या तोंडात पकडला आणि नागाच्या तोंडावरच हल्ला केला. मुंगसाच्या तीक्ष्ण दातांच्या चाव्याने नागाचा पराभव झाला. मुंगसाने नागाच्या तोंडाला चावा घेऊन गंभीर जखमी केलं आणि त्याला ओढत रस्त्याच्या लगतच्या गवताळ भागात नेलं. या ठिकाणी मुंगसाने नागाला ठार करत आपलं अन्न मिळवलं.