पंढरपूर : पुणे जिल्ह्यातील मोठा पाऊस आणि उजनी, वीर धरणांमधील मोठ्या विसर्गामुळे येथील भीमा उर्फ चंद्रभागेला पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच सोमवारी मोठा पूर आला. या पुराने चंद्रभागा नदीने धोका पातळी ओलांडत पंढरपूरमधील नदी काठालगतची २० गावे तसेच शहरालगत पूर स्थिती निर्माण केली आहे. वाळवंटातील सर्व मंदिरे, घाट पाण्याखाली गेले आहेत. शहरातील नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

जिल्ह्यासाठी वरदायानी असलेले उजनी धरण हे रविवारीच १०० टक्के भरले. यातच भीमा आणि नीरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामुळे सोमवारपासून उजनी धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजता १ लाख ३० हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. तर दुसरीकडे नीरा नदीच्या खोऱ्यातून येणारे पाणीही वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात आले आहे. या दोन्ही धरणातील विसर्गामुळे भीमा आणि नीरा नदीला पूर आला आहे. अकलूजजवळील नृहसिंहपूर येथे या नीरा आणि भीमा नदीचा संगम होतो. या दोन्ही नद्यांचे पुराचे पाणी पुढे एकत्रितरित्या आज पंढरपूरला धडकले.

हेही वाचा : कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये – जयंत पाटील

भीमा आणि नीरा नद्यांच्या पुराने पंढरीत भीमा उर्फ चंद्रभागेला पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच सोमवारी मोठा पूर आला. या पुराने चंद्रभागा नदीने धोका पातळी ओलांडत पंढरपूरमधील नदी काठालगतची २० गावे तसेच शहरालगत पूर स्थिती निर्माण केली आहे. वाळवंटातील सर्व मंदिरे, घाट पाण्याखाली गेले आहेत. शहरातील नदीकाठच्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.तालुक्यातील सर्व लहान मोठे सर्व बंधारे, पूल पाण्याखाली गेले असून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बच्चू कडू यांचा इशारा; म्हणाले, “उचलून थेट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील नदीकाठच्या स्थलांतरित कुटुंबांना उपजिल्हा रुग्णालयाजवळील रायगड दिंडी समाज मठात स्थलांतरित केले आहे. शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे, पाण्यात जाऊ नये अशा सूचना देत असल्याची माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी ॲड. सुनील वाळूजकर यांनी दिली आहे. दरम्यान भीमेत होणारा सध्याचा विसर्ग १ लाख ३० हजारांचा आहे. हा विसर्ग पावणे दोन लाखांच्या लाखांच्या वर गेल्यास पुराचे पाणी शहरात शिरण्याचा धोका भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के हरसुरे यांनी व्यक्त केला. वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.