सांगली : पर्यटनासाठी गेलेल्या डॉक्टरांचा बंद बंगला फोडून सोनेचांदी लंपास करणार्‍या टोळीला सांगली पोलीसांनी मुंबईतील ढाब्यावर अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील साडेबारा लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात यश आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शनिवारी दिली.

विश्रामबागमधील पद्मावती नगरीतील डॉ.वैभव माने हे १६ डिसेंबर रोजी पर्यटनासाठी बंगल्याला कुलुप लावून गेले होते. त्यानंतर अज्ञातांनी ग्रिल कापून आत शिरून आतील सोन्याचे दागिने, चांदीची भांडी असा ऐवज लंपास केला होता. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.

Bee attack on wrestling ground near Patan karad
पाटणजवळ कुस्ती मैदानावर मधमाशांचा हल्लाबोल; पहिलवानांसह १५ जण जखमी
Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

आणखी वाचा-२९४ कोटी पीकविम्यासाठी विमा कंपनीचे खाते सील

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी विक्रम खोत यांना ही चोरी करणार्‍या चोरट्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मुंब्रा ते पनवेल महामार्गावरील सुखदेव ढाबा येथे छापा टाकून अंजूम शेख (वय ४१, रा. पसरा राबोडी, ठाणे), रमेश कुंभार (वय ४३ रा. कशेळी, भिवंडी) आणि रफिक शेख (वय ४० रा. राबोळी ठाणे) या तिघांना अटक करण्यात आली.

या तिघांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या कालावधीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. चोरीतील १५ तोळे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४ किलो ९०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, मुर्ती, भांडी असा १२ लाख ६० हजाराचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. तसेच या चोरीसाठी वापरण्यात आलेली १ लाख ७० हजाराची मोटारही हस्तगत करण्यात आली आहे.