वाई : सातारा नवीन औद्योगीक वसाहत परिसरातील कचरा डेपोला आग लागल्याने या भागात धुराचे लोट पसरले आहेत. यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील कचरा डेपोला आग लागल्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. चंदनवाडी कोडोली एमआयडीसी परिसरात नागरिक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा >>> लव्ह जिहाद, धर्मांतराविरोधात कराडला भव्य हिंदू गर्जना मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचरा डेपोच्या वासामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.त्यांना श्वसनाचे व वेगवेगळे आजारही होत आहेत. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या कचरा डेपो बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असून त्यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केलेल्या होत्या. त्यामुळे नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत सातारा येथील औद्योगीक वसाहत व कोडोली धनगरवाडी गावातील कचऱ्याचाप्रशन तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकास महामंडळ, ग्रामपंचयात व उद्योजक यांनी समन्वयाने काम करावे. एमआयडीसीने त्यासाठीचा प्रस्ताव पाठपुरावा करुन लवकरात लवकर मंजूर करुन आणावा अशा सूचना  जिल्हाधिकारी रुचंश जयवंशी यांनी केल्या होत्या. यावर कार्यवाही होण्यापूर्वीच या कचरा डेपोत आग लागल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.