राज्यात या वर्षी ऋतूचा असमतोल आहे. अवेळी पाऊस, गारांचा वर्षाव तर कधी कडक ऊन पडत आहे. त्याचा फटका बळीराजाला बसून, त्याचे मोठय़ा प्रमाणात आíथक नुकसान होते. हा ऋतूचा असमतोल जाऊ दे. हे सतत बदलणारे ऋतुमान व्यवस्थित होऊ दे व राज्यातील सर्व शेतकरी, जनतेला सुखी, समृद्ध ठेव, असे साकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दख्खनच्या राजाला घातले.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबा देवाच्या चत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री पाटील यांनी श्री जोतिबाचे सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते मानाच्या निनाम पाडळी आणि विहे येथील सासनकाठींचे पूजन झाले. त्यानंतर ते बोलत होते.
या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हवामान असमतोल असल्याने नसíगक संकटे येत आहेत. तसेच राज्यापुढे एल. बी. टी., टोल, साखरदर यासारखे गंभीर प्रश्न उभे आहेत. राज्यावर येणाऱ्या नसíगक संकटांसह एल.बी.टी, टोलसारख्या गंभीर प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघू देत, असे साकडे या वेळी पालकमंत्र्यांनी घातले.
या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, पाटणचे आमदार शंभूराजे देसाई, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, महापौर तृप्ती माळवी, सरपंच रिया सांगळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र खाडे, राधानगरी-कागलच्या उपविभागीय अधिकारी मोनिका सिंह, देवस्थानच्या समितीच्या सचिव शुभांगी साठे आदी मान्यवर उपस्थित होते.