अलिबाग– भरत गोगावले हे दृश्य स्वरूपात मंत्री नसले, तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्रीच आहेत, माझ्या गैरहजेरीत जिल्ह्याची जबाबदारी योग्य संभाळत आहेत, आगामी काळात ते दृष्यस्वरूपात मंत्री दिसतील, असे स्पष्टीकरण पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिले. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

हेही वाचा >>> Vishalgad : “कधी गडावर गेलात का? निधी दिलाय का?”, संभाजीराजेंचा मुश्रीफांवर पलटवार; सतेज पाटलांनाही प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी त्यांच्या समवेत उपस्थित होते. छगन भुजबळ आणि सनेत्रा पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली असली तरी त्याचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. छगन भुजबळ यांनी पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. आणि सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची का भेट घेतली हे त्याच सांगू शकतील. मात्र महायुतीत कुठलाही विसंवाद नाही. तिन्ही पक्षात चांगला समन्वय आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत त्याची प्रचिती आली आहे.  आगामी विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात महायुतीचीच सत्ता येईल आणि रायगडचा पुढचा पालकमंत्रीही महायुतीचाच असेल असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.