शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि आमदार गुलाबराव पाटील सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटावर त्यातही प्रामुख्याने खासदार संजय राऊतांवर टीका करत आहेत. गुलबरावांनी आज पुन्हा एकदा राऊतांवर आणि पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे गटाबद्दल गुलाबराव पाटील म्हणाले, चाहापेक्षा किटली गरम असल्यावर असंच होणार. पाटील म्हणाले, ते आम्हाला गुंड म्हणतात, परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ज्याच्यावर एकही केस (खटला) नाही तो शिवसेनेचा शाखाप्रमुखही होऊ शकत नाही.

गुलाबराव पाटील म्हणाले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, ज्याच्या अंगावर पोलीस केस नाही, तो शाखाप्रमुखही होऊ शकत नाही. ते (ठाकरे गट) आमच्यावर टीका करतात की, आम्ही गुंड आहोत, आम्ही गद्दारी केली. परंतु त्या संजय राऊतांना जाऊन विचारा आम्हाला गद्दारी करायला कोणी लावली. चहापेक्षा किटली गरम असेल तर असेच धंदे होणार.

हे ही वाचा >> “अजित पवार नॉट रिचेबल?” विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांना सुनावलं, म्हणाले, “बंद करा ते”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

दरम्यान, गुलाबरावांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. पाटील म्हणाले की, ज्या काँग्रेसने आम्हाला (शिवसैनिकांना) तुडवलं, ज्या काँग्रेसने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वेळा आमची शिवसेना फोडली. त्यांच्यासोबत तुम्ही (उद्धव ठाकरे) मांडीला मांडी लावून बसला आहात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. सर्वात आधी छगन भुजबळ, मग नारायण राणेंना आणि त्यानंतर राज ठाकरे यांना फोडलं. आज तुम्ही त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांसोबत जाऊन बसला आहात.