gulabrao patil statement on water department spb 94 | Loksatta

“आग्रह धरला असता, तर चांगलं खातं मिळालं असतं, मात्र…”; मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान

भुसावळ तालुक्यातील कंडारी, फुलगाव, कोठोरा व कठोरा बुद्रुक या चार गावाच्या १३ कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

“आग्रह धरला असता, तर चांगलं खातं मिळालं असतं, मात्र…”; मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान
संग्रहित

भुसावळ तालुक्यातील कंडारी, फुलगाव, कोठोरा व कठोरा बुद्रुक या चार गावाच्या १३ कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाबाबत महत्त्वाचं विधान केलं. ”मी जर एकनाथ शिंदेंकडे आग्रह धरला असता, तर यापेक्षा चांगलं खातं मिळालं असतं”, असं ते म्हणाले.

हेही वाच – “चंद्रकांत खैरेंसाठी हिमालयात एक गुहा…”, शहाजी बापू पाटलांची मिश्कील टिप्पणी; म्हणाले…

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

“जायकवाडी धरणाच्या जवळ असलेल्या एका गावात टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. मागाच्या काळात मराठवाडा ग्रीड म्हणून आम्ही योजना राबवली होती. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होते. त्यावेळी तेथील लोकं मला पाणीवाला बाबा म्हणून संबोधत होते. त्यामुळे पाणीपुरवठा खात्यात काम करताना मलाही खूप आनंद होतो. मी पाण्याच्या कामात राजकारण कधीही केलं नाही”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा – “सचिन वाझे हे ‘मातोश्री’वर दर महिन्याला…”; शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

“प्रत्येक जण हा नावासाठी धडपत असतो. त्यामुळे जीवनात आपल्याला चांगली कामं करावी लागतात. ही चांगली कामं करायची जबाबदारी मागच्या सरकारनेही माझ्यावर दिली होती. तसेच यावेळी जर मी थोडं आग्रह पडकला असता, तर यापेक्षा चांगलं खातं मिलाळं असतं. पण मी स्वत:हून पाणीपुरवठा खातं मागून घेतलं. कोणत्याही पक्षाच्या माणसाला पाण्याची गरज असते. पुरुषांपेक्षा जास्त हा महिलांचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी काम करण्याची संधी मिळते, याचं मला समाधान आहे”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-10-2022 at 15:09 IST
Next Story
“१९९२ च्या मुंबई दंगलीत तुम्ही होता, म्हणून…” शिंदे गटाचं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र