वाई : साताऱ्यात मोठ्या उत्साहात गुलमोहर दिन साजरा करण्यात आला. १ मे हा गुलमोहर दिन म्हणजे चित्र, कविता, लेखन संगीत तसेच कला अविषकारांचा संगम सातारामध्ये पहायला मिळतो. भारतातून वेगवेगळ्या भागातून कलाकार या महोत्सवात सहभागी होत असतात.

१ मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्य भर साजरा केला जात असला तरी साताऱ्यात मात्र हा दिवस गुलमोहर दिन म्हणून गेल्या २५ वर्षांपासून साजरा केला जात आहे. हा गुलमोहर दिन म्हणजे चित्र, कविता, लेखन संगीत तसेच कला अविषकारांचा संगम सातारा मध्ये पहायला मिळतो. भारतातून वेगवेगळ्या भागातून कलाकार या महोत्सवात सहभागी होत असतात.

आणखी वाचा-पर्यटकांसाठी महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये आकर्षक बोटी, उन्हाळी हंगामासाठी प्रशासन सज्ज

रखरखत्या उन्हाळ्यात रस्त्याचा कडेला लाल, पिवळा, निळसर जांभळा गुलमोहर, बहावा फुललेला पाहून मनाला एक प्रकारचा गारवाच मिळत असतो. उन्हाळ्यात ज्यावेळी सर्व झाडे कोमेजून जातात त्यावेळी मस्त पैकी वेगवेगल्या रंगाने फुललेला गुलमोहर लोकांचे लक्ष वेधून घेत असतो. हाच विचार घेऊन साताऱ्यातील काही पर्यावरण प्रेमींनी हा दिवस गुलमोहर दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि आज या गुलमोहर रंगोत्सवाचे २६ वे वर्ष आहे. लहान, मोठे सर्वजन साताऱ्यातील एका ठिकाणी जमतात आणि गुलमोहराच्या झाडाची, त्याच्या फुलांची खूप छान छान चित्रे काढतात. या वेळी गाणी आणि कविताही म्हटल्या जातात.

आणखी वाचा- फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करा – शरद पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज गुलमोहराची चित्रे रेखाटली गेली आणि काहींनी कविता, चारोळ्या सादर केल्या तसेच एकमेकांना गुलमोहर दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर काही युवकांनी गुलमोहराच्या झाडाला पाणी घालून हा गुलमोहर दिन साजरा केला. गुलमोहर रंगोत्सव आता आणखी बहरू लागला आहे महाराष्ट्रामधील कलाकार तर सहभागी होत आहेतच मात्र भारतातील छोटे मोठे कलाकार आपले कलाविष्कार सादर करताना दिसले. एकही कलाकार इथे आपली कला सादर करताना मानधन घेत नाही हे वैशिष्ट्य आहे असंच म्हणावं लागेल