हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृह औरंगाबाद येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत गुरुवारी ही घोषणा केली. हज यात्रेसाठी मराठवाडय़ातून मुस्लिम बांधव मोठय़ा प्रमाणावर जात असतात आणि म्हणूनच औरंगाबाद येथे हज हाऊस होण्याबाबतचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता. त्याप्रमाणे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसाठी वंदे मातरम् सभागृहाची मागणीसुद्धा होती. यासंबंधी एक बैठक घेण्यात येऊन या दोन्ही बाबत निर्णय घेण्यात आला.
वंदेमातरम् सभागृह उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे तर हज हाऊसचे बांधकाम अल्पसंख्याक विभागातर्फे बांधकाम होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत वडाळा येथे महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी जागा देण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी प्रश्न विचारला तर शिवरायांचे स्मारक नेमके कुठे होणार याचा खुलासा शासनाने करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी
केली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2012 रोजी प्रकाशित
हज हाऊस, वंदेमातरम् सभागृह औरंगाबाद येथे उभारणार
हज हाऊस आणि वंदे मातरम् सभागृह औरंगाबाद येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत गुरुवारी ही घोषणा केली.
First published on: 22-12-2012 at 03:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haj house and vandemataram hall will build in aurangabad