बुलढाणा : अतिवृष्टीचा जबर फटका बसलेल्या मेहकर व लोणार तालुक्याला राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याने या दोन तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या हजारो शेतकरी आणि ग्रामस्थांतून याचा निषेध करण्यात येत असून रोष व्यक्त करण्यात येत आहे.या संवेदनशील पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. आज शुक्रवारी, १० ऑक्टोबर रोजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड तर्फे मेहकर व लोणार तहसील कार्यालया समोर घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.

शासन प्रशासनतर्फे करण्यात आलेल्या या अन्यायाचा तीव्र निषेध करण्यात आला. मेहकर व लोणार तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश न झाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी आंदोलना दरम्यान प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत बोलतांना दिला. या आशयाचे निवेदन देखील देण्यात आले.

यावरच न थांबता मेहकर व लोणार तालुका अतिवृष्टीच्या मदतीतुन वगळल्यामुळे संभाजी ब्रिगेडने कृषीअधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पालकमंत्री मकरंद पाटील व कृषीमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली.तसेच लोणार तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष विजय पिसे यांच्या नेत्रुत्वात आंदोलन व निदर्शने करन्यात आली.जर मदतीमद्ये मेहकर व लोणार तालुक्यांचा सामावेश केला नाही तर सामुहिक आत्महत्येचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देन्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड पदाधिकार्यांसहीत दोनही तालुक्यातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले.

याअगोदर ऑगष्ट महीन्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे दोनही तालुक्यांचा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती त्याचीही आठवण मंत्र्यांना करुन दिली. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे मेहकर तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल, तालुका संघटक भागवत दिघडे, कार्यकारिणी सदस्य गजानन पवार, गजानन डव्हळे,गणेश तोंडे,भागवत डव्हळे,रवि वाघ, राजेंद्र बाजड ,रिंकेश काळे, ज्ञानेश्वर डव्हळे, विवेक सिरसाट,संतोष डव्हळे,सुरज दुगड,समाधान डव्हळे,जय अंभोरे, विशाल डव्हळे,वामन डव्हळे, माजी पंचायत समिति सदस्य प्रदीप डव्हळे, गोपाल डव्हळे, प्रविण डव्हळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.