सातारा : साताऱ्याच्या संग्रहालयात मागील सात महिन्यांपासून असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे शुक्रवारी (दि. ३१) नागपूरला रवाना झाली आहेत. उद्या १ फेब्रुवारीपासून ही वाघनखे नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात आठ महिने पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. साताऱ्यातील संग्रहालयात या वाघनखांसाठी तयार करण्यात आलेल्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा तसेच साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज यांचा बिचवा अथवा शिवकालीन एकधारी वाघनखं ठेवण्याबाबत पुरातत्त्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे.

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ही ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात १९ जुलै २०२४ रोजी दाखल झाली. २० जुलैपासून ही वाघनखे तसेच शिवशस्त्र शौर्यगाथा हे शस्त्र प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत राज्यभरातील साडेचार लाखांहून अधिक नागरिकांनी या संग्रहालयाला भेट दिली. पुरातत्व विभाग व राज्य शासनाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार या ऐतिहासिक वाघनखांचा साताऱ्यातील मुक्काम ३१ जानेवारीला पूर्ण होत आहे. १ फेब्रुवारी ते २ ऑक्टोबरपर्यंत ही वाघनखे नागपूर येथे तर त्यानंतर ३ ऑक्टोबर ते ३ मे २०२६ पर्यंत ती कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.

आजच्या अर्थसंकल्पाकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष, निर्यात परतावा कर, जीएसटी आकारणी, कर्ज पुरवठ्याबाबत अपेक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डाव्या हाताचा ठसा सातारा संग्रहालयात आहे. हातावर चंदनाचा लेप लावून तो ठसा कागदावर उमटवण्यात आला आहे. म्हसवड येथील राजमाने घराण्याकडून हा ठसा ५० वर्षांपूर्वी संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आला. इतिहासतज्ज्ञ. ग. ह. खरे यांनी हा ठसा त्यावरील माहितीचे वाचन केले होते. या ठशासह साताऱ्याचे संस्थापक शाहू महाराज थोरले यांचा बिचवा व शिवकालीन एकधारी वाघनख अशा ऐतिहासिक वस्तुंचे येथे संवर्धन करण्यात आले आहे. ऐतिहासिक वाघनखांसाठी बनवलेल्या दालनात यापैकी एक वस्तू ठेवण्याबाबत पुरातत्व विभागाकडून विचारमंथन सुरू आहे. प्रवीण शिंदे संग्रहालय अभिरक्षक