scorecardresearch

पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी पतीची चितेवरून विहिरीत उडी मारुन आत्महत्या, चंद्रपुरातील ह्रदयद्रावक घटना

गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीची आत्महत्या

विहिरीत आढळले नऊ मृतदेह (प्रातिनिधिक फोटो)
चंद्रपूर येथे रविवारी १९ वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. सोमवारी तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतांना अचानक जळत्या चितेवर पती किशोर खाटीक यांनी उडी घेतली. यावेळी उपस्थित जमावाने किशोरला चितेबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने जमावाला न जुमानता चितेलगतच्या विहिरीत उडी घेतली.त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवविवाहित गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने देखिल स्वत:ला संपविल्याची हदयद्रावक घटना भंगाराम तळोधी येथे घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील किशोर खाटिक याच्याशी झाला होता. ती तीन महिन्याची गर्भवती होती. आपल्या पतीसह चंद्रपूर येथे ती वास्तव्यास होती. दरम्यान चार दिवसापुर्वी रूचिता भंगाराम तळोधी येथे माहेरी आली. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती घराबाहेर पडली. पण बराच वेळ झाला तरी ती घरी परतलीच नाही. यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली. दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ तिची चप्पल आढळून आली. यामूळे शंकेची पाल चुकचुकली.

गोंडपिपरी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचिताचा मृतदेह आढळून आला. यामुळे कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. टाळेबंदीपूर्वी तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

रूचिताचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असतांना सोमवारी तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होता. यावेळी अचानक पेटत्या चितेवर पती किशोरने उडी घेतली. यावेळी जमावाने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाला न जुमानता स्वत:ला संपविण्याच्या प्रयत्नात त्याने लगतच्या विहिरीत उडी मारली. यावेळी उपस्थितांनी आरडाओरड केली. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाचारण केले. मात्र सारे प्रयत्न निष्फळ ठरले. पत्नी रुचितासोबत पती किशोरने जगाचा निरोप घेतला. मन हेलवणाऱ्या या घटनेननंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रुचिताच्या वडिलांचं निधन झालं होतं. ती आईसह आजोबाकडे भंगाराम तळोधीला राहायची. अशाचच आई अपंग असल्याने मामाने जोडीदार शोधून रुचिताचे लग्न मार्चमध्ये आटोपून घेतले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband commit suicide after wife death in chandrapur sgy

ताज्या बातम्या