महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये एसटी कामगारांना संघर्ष करावा लागणार नाही; अनिल परब यांचा जुना व्हिडीओ व्हायरल

कथित वायरल व्हिडीओ हा फेब्रुवारी २०२० असल्याचा दावा केला जात आहे, एसटी कर्मचाऱ्यांचा मेळाव्यात अनिल परब यांनी आश्वासन दिले होते

anil parab
(प्रातिनिधिक छायाचित्र)

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेत नाहीये. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनिकरण करावे या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. संपामुळे राज्यातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. अनिल परब यांनी संप मागे घेण्याचे आवाहन करत चर्चेची दारं खुली असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर भाजपच्या नेत्यांनी या संपात सहभागी होत हे आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. एकंदरितच संपाचा पेच सुटण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीये.

असं असतांना अनिल परब यांचा एक व्हिडीओ सोशल माध्यमांवर वायरल झाला आहे. संबधित व्हिडिओ हा फेब्रुवारी २०२० मधील आहे असा दावा केला जात आहे. अनिल परब हे एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करत आहेत. “मी एवढंच आश्वासित करु इच्छितो की या आमच्या महाविकास आघाडच्या कारकिर्दीमध्ये एसटी कामगारांना आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करावा लागणार नाही एवढं मी वचन देतो”,असं अनिल परब यांनी या व्हिडीओत वक्तव्य केल आहे.

यानिमित्ताने भाजपाने अनिल परब यांच्यावर टीकेची संधी सोडलेली नाही. किती खोट्या शपथा अन् वचनं घेणार…थोडी फार उरली असेल तर शब्दाला जागा…. अशी टीका भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान आज संप मिटण्याबाबत काही हालचाल होते का याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. सदाभाऊ खोत यांनी अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनिल परब यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या निवासस्थानी बंदोबस्त ठेवण्यत आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I promise st workers will not have to fight for their demands said by anil parab asj

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या