धवल कुलकर्णी 

1 फेब्रुवारीला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच पुरातत्त्वीय स्थळांच्या संवर्धनासाठीची घोषणा केली. राखीगढी, हस्तीनापुर, शिवसागर, धोळविरा आणि अडीचांनालूरच्या संवर्धन आणि संरक्षणाबाबत घोषणा केली. ही घोषणा अर्थातच महत्त्वाची आहे कारण हरियाणामध्ये असलेले राखीगढी हे हडप्पा पूर्वकालीन संस्कृती चे अवशेष सापडण्याचे ठिकाण आहे तर उत्तर प्रदेशातील हस्तीनापूर ही कधीकाळी कौरव आणि पांडवांची राजधानी होती असं म्हणतात.

परंतु दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी अशीच घोषणा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे दहा हजार वर्षे जुन्या असलेल्या कोकणातल्या कातळशिल्पांबाबत करण्यात आली होती. मात्र ही घोषणा होऊन सुद्धा अद्यापपर्यंत प्राचीन काळातला हा ठेवा जपण्यासाठी किंवा त्याच्या संवर्धन करण्यासाठी कुठलीही ठोस पावलं अजूनही उचलण्यात आलेली नाहीत…

2018 चा अर्थसंकल्पआत रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या साधारणपणे चारशेच्या आसपास कातळशिल्प यांच्या संवर्धनासाठी आणि पर्यटन साठी 24 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने ही घोषणा प्रत्यक्षात उतरली नाही. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कल्याण खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या पुरातत्व संचलनालयाने कातळ शिल्पांच्या संवर्धन, संरक्षण आणि जपणुकीसाठी पाठवलेले प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेले नाहीत.

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये साधारणपणे दहा हजार वर्षे जुनी अश्मयुगातील कातळशिल्पं अस्तित्वात आहेत. ही कातळशिल्पं जमिनीवर करण्यात आली आहेत. दहा हजार वर्षांपूर्वी पासून ते दोन हजार वर्षापूर्वी पर्यंतच्या काळात याची निर्मिती मानवाने केली असावी.

सर्वात मोठं कातळशिल्प साधारणपणे 57 ते 17 फूट इतक्‍या प्रचंड व्यासाचं आहे तर सर्वात लहान साधारणपणे दोन ते तीन सेंटिमीटर आकाराचं आहे. मात्र ही कातळशिल्पं नेमकी कोणी कोरली असावी याच्या बाबत अजूनही ठोस पुरावा पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मिळाला नाही तरीसुद्धा सिंधुदुर्गातल्या कणकवली तालुक्यातल्या कोळोशी येथे एक प्राचीन गुहा सापडल्यानंतर इथे उत्खनन करून या गुहेत राहणाऱ्या आदी मानवांनी ही कातळशिल्पं कोरली होती का? याबाबत अनुमान काढता येईल येईल.

या गुहेमध्ये काही दगडाची अवजारे सापडली होती ज्यांचा वापर कदाचित कातळशिल्प खोदायला झाला असावा. काही कातळशिल्पांमध्ये एक शिंगी गेंडा हत्ती वगैरे सारखे प्राणी जी आज कोकणात दिसत नाहीत यांचीसुद्धा चित्र आहेत.

“मागच्या वर्षी संचलनालयाने 17 कातळशिल्पांबाबत एकूण चार कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठवले होते. ही कातळशिल्पं रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. हे प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहेत. रुपये 24 कोटीचा निधी देण्याची घोषणा जरी झाली असली तरीसुद्धा ज्या प्रमाणामध्ये योजना अपेक्षित होते ते झालेले नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारणपणे बाराशेच्यावर कातळशिल्पं साधारणपणे 65 ठिकाणी सापडली आहेत तर सिंधुदुर्गमध्ये पाच ठिकाणी सातच्या आसपास कातळशिल्पांचा शोध लागला आहे. आत्तापर्यंत सापडलेलं सर्वात मोठं कातळशिल्प हे सत्तावन्न फूट बाय 17 फूट आकाराचे आहे. यामध्ये आपल्याला एक मानव प्रत्येक हातामध्ये एक एक वाघ पकडलेल्या अवस्थेत दिसतो. अशाच प्रकारची चिन्हं फरकाच्या संस्कृतीमध्ये दिसतात हे अजून एक विशेष. कातळशिल्पांचा शोध केरळ आणि गोव्यातल्या फांसाईमाल मध्ये सुद्धा लागलेला आहे.