असदुद्दीन ओवैसींवर नवनीत राणा कौर यांनी टीका केली होती. एवढंच नाही तर इस देशमें रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा असंही आव्हान त्यांनी दिलं होतं. इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले, त्यांच्यात धमक असेल तर एकदा अमरावतीत लढून दाखववं आणि निवडून येऊन दाखवावं. जलील यावेळी संभाजी नगरातून कसे निवडून येतात तेच मी बघते असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. या सगळ्यावर आता इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
नवनीत राणा यांच्याबाबतीत मला एक म्हण आठवते. इन्सान कितना भी अच्छ क्यूँ न हो कुत्तेसे अच्छा भौंक नही सकता. मी हे नवनीत राणा यांना बोलत नाही. पण ज्या प्रकारे या महिला भाषा वापरत आहेत, मला सांगण्यात आलं आहे की त्या SC कॅटेगरीतून निवडून आल्यात. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की नाही हे मला माहीत नाही. पण लोकसभेत त्या फक्त भाजपाकडून तिकिट हवं आहे म्हणून काही गोष्ट करत असतात. संविधान त्या विसरल्या आहेत. संविधानात बळजबरीची तरतूद नाही.
हे लोक नथुराम गोडसेच्या प्रवृत्तीचे
असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत सांगितलं होतं की आम्ही पुरुषोत्तम रामाचा आदर करतो पण आम्ही नथुराम गोडसेचा आदर करत नाही. हे नथुरामच्या प्रवृत्तीचे लोक आहेत. या महिला खासदारांबाबत मी सांगेन की त्या संवग प्रसिद्धी मिळवतात. हनुमान चालीसा यांना स्वतःच्या घरात नाही तर उद्धव ठाकरेंच्या घरासमोर वाचायची होती. तेव्हा या महिला उद्धव ठाकरेंचं नाव घेत होत्या. आता ओवैसी यांचं नाव घेऊन टीका करत आहेत. असं उत्तर जलील यांनी दिलं आहे. अशा महिलांना आम्ही महत्व देत नाही असंही जलील म्हणाले.