कराड : पाटण तालुक्यातील प्रसिद्ध ओझर्डे धबधब्याला मद्यधुंद हुल्लडबाजांमुळे ग्रहण लागले आहे. सध्या ओझर्डे धबधबा पर्यटकांसाठी बंद असताना धबधब्याचे मुख्य दरवाजा उघडण्याच्या कारणावरून तेथील वनमजुराला कराडमधील नऊ मद्यधुंद पर्यटकांनी जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना काल सोमवारी रात्री घडली आहे. बेदम मारहाणीत वनमजूर विजय शेलार (रा. नवजा, ता. पाटण) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्या फिर्यादीवरून कोयना पोलिसांनी नऊ पर्यटकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

हेही वाचा : सोलापूर: खोट्या लग्नासाठी पैशाच्या आमिषाने तरूणीला राजी करून फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांची माहिती अशी की, आफताब नायकवडी, रिहान डांगे, अजमेर मांगलेकर, वसंत माने, मुद्दसर शेख, मुमिल्ल शेख, साद मुलाणी, हुजेफा शेख, अन्वर मुल्ला (सर्व रा. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत. सध्या ओझर्डे धबधबा बघण्यासाठी पर्यटकांना बंदी असतानाही सोमवारी (दि. ८) रात्री ओझर्डे धबधबा पाहण्यासाठी वनविभागाने केलेले धबधब्याचा मुख्य दरवाजा उघडण्याच्या कारणावरून त्याठिकाणी कर्तव्यास असलेले वन्यजीव विभागाचे वनमजूर विजय शेलार यांना मद्यधुंद अवस्थेत आलेल्या आणि सध्या अटकेत असलेल्या वरील नऊ जणांनी जबर मारहाण केली. त्यात वनमजूर शेलार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत.