मुंबई: राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींची निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत ५१ हजार ७२ अर्ज प्राप्त झाले असून नगराध्यक्षपदासाठी ४१९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक ११८११ अर्ज हे छत्रपती संभाजीनगर विभागातून आले असून अर्ज मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नगरपालिका व नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी छाननी प्रक्रिया पार पडली आहे. ५१ हजार ७२ उमेदवारांच्या अर्जातून छाननी प्रक्रियेत काही अर्ज बाद ठरणार आहेत. प्राप्त अर्जांपैकी अमरावती विभागात अकोल्यातून ९३१, अमरावतीतून १६५८, भंडारा १०६, बुलढाणा २५५७, वाशिम १०६५, यवतमाळ २१७५ असे एकूण ८४९२ अर्ज वैध ठरले.

छत्रपती संभाजीनगर विभागात बीड २२८६, छत्रपती संभाजीनगर १३१२, धाराशीव २३०८, हिंगोली ९३३, जालना ४१६, लातूर ११९३, नांदेड २१५३, परभणी १२१० असे एकूण ११८११ अर्ज वैध ठरले. कोकण विभागात पालघर ४६६, रायगड ९००, रत्नागिरी ६३५, सिंधुदुर्ग ३५९, ठाणे ६५० असे एकूण ३०१० अर्ज वैध ठरले आहेत. नागपूर विभागातून भंडारा ८१९, चंद्रपूर १५४५, गडचिरोली ४३२, गोंदिया ७००, नागपूर २६२६, वर्धा १००३ असे एकूण ७१२५ अर्ज पात्र ठरले आहेत. नाशिक विभागात अहिल्यानगर २२७२, धुळे ५९५, जळगाव ३८३५, नंदूरबार ७२६, नाशिक २१६२ अर्ज वैध ठरले तर पुणे विभागात कोल्हापूर १८६७, पुणे ३७३५, सांगली १५७९, सातारा १५९४, सोलापूर २२६९ असे एकूण ११ हजार ४४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी आलेल्या एकूण ४१९८ अर्जांत पुणे विभागात ८२३, नाशिक ७१३, नागपूर ५७७, कोकण २००, छत्रपती संभाजीनगर ११९२, अमरावती विभागातून ६९३ अर्ज प्राप्त झाले आहेत.