रत्नागिरी: संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपूळे येथील गणपती मंदिराला समुद्राच्या लाटांचा चांगलाच तडाखा बसू लागला आहे. उधाणलेल्या समुद्राच्या लाटांनी मंदिरापर्यंत धडक मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या लाटा आणखीनच वाढल्यास मंदिरात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्राला गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. समुद्राच्या लाटा थेट गणपती मंदिराच्या पायथ्याशी जाऊन धडकत आहेत. काही लाटा थेट गणपती मंदिराच्या पश्चिमद्वार असलेल्या मुख्य गेटपासून प्रांगणात प्रवेश करत आहेत. गणपतीपुळे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे येथील समुद्र मोठ्या प्रमाणात खवळल्याने समुद्राला उधाण आले आहे.

हेही वाचा : Chandrkant Khaire: “..तर गद्दारांना पाडण्यासाठी विधानसभा निवडणूक लढणार”, चंद्रकांत खैरेंची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे दृश्य पाहण्यासाठी भाविक व पर्यटकांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांची गर्दी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून येभील समुद्राला मोठ्या प्रमाणात येत असलेल्या उधाणामुळे पर्यटक व भाविकांनी समुद्रकिनाऱ्यावर उतरू नये, तसेच खोल समुद्राच्या पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये. याकरिता गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान समिती तसेच पोलीस यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहेत.