सांगली : बालपणीच आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मिरजेतील कार्तिकी व राज संतोष म्हैसाळे या दोन बालकांचे पालकत्व पालकमंत्री सुरेश खाडे यांचे चिरंजीव भाजपचे युवा नेते सुशांत खाडे यांनी स्वीकारले आहे. त्यांच्या घरी भेट देउन त्यांनी मायेचा आधार देत मायबापाविना पोरक्या झालेल्या मुलांची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा : “छगन भुजबळ व्हाया सुरत, गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत, त्यांना…” ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरजेतील नदीवेस परिसरात वास्तव्यास असलेले संतोष आप्पासाहेब म्हैसाळे यांच्या पत्नीचे चार-पाच वर्षांपुर्वी निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर मुलगी कार्तिकी व मुलगा राज यांचे संगोपन ते करीत असतानाच त्यांना कर्करोग झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. पत्नीच्या आजारपणासाठीही त्यांनी मोठा खर्च केला असल्याने आता कर्करोगावर उपचारासाठी होणारा मोठा खर्च कसा करायचा या विवंचनेत त्यांनी दहा दिवसांपुर्वी आत्महत्या केली. यामुळे आईबापाविना कार्तिकी व राज म्हैसाळे ही दोन्ही मुले पोरकी झाली. कार्तिकी (वय १०) इयत्ता पाचवीत तर राज (वय ८) इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे. या लहान मुलांच्या शिक्षणाची व पालनपोषणाची जबाबदारी खाडे यांनी स्वीकारली असून त्यांची भेट घेऊन त्यांनी दिलासा दिला.