सांगली : सांगली जिल्ह्यातील वारणाकाठासह म्हैसाळ सिंचन योजनेखाली असलेल्या पूर्व भागाला वरदान ठरणारे चांदोली धरण सोमवारी रात्री तुडुंब भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस अजूनही सुरू असल्याने पायथा विद्युतगृहाद्वारे नदीपात्रात ४५० क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने धरण भरेल की नाही, अशी शंकास्पद स्थिती निर्माण झाली होती. पण त्यानंतर पावसाच्या पुनरागमनानंतर धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी असून सध्या धरणातील पाणीसाठा ३४.४१ टीएमसी झाला आहे. धरणात पाण्याची आवक १ हजार १०२ क्युसेक प्रतिसेकंद आहे. हेही वाचा : पडळकरांसह अजित पवार गटातील नेत्यांवर रोहित पवारांचा संताप; म्हणाले, “चॉकलेट बॉय…” यंदाच्या हंगामात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ हजार ६५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर धरण काठोकाठ भरले आहे. तर पश्चिम घाटात महत्वाचे असलेल्या कोयना धरणात मंगळवारी सकाळी ८९.३३ टीएमसी पाणीसाठा झाला असून एकूण क्षमतेच्या ८४.२७ टक्के पाणीसाठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. हेही वाचा : आमंत्रण नसताना बिबट्या पार्टीला; पोरांची मात्र पळता भुई थोडी गेल्या २४ तासांत कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात कोयना येथे २९ , महाबळेश्वर येथे ५३ तर नवजा येथे २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात झाला. शिराळा तालुक्यात १२.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.