scorecardresearch

आमंत्रण नसताना बिबट्या पार्टीला; पोरांची मात्र पळता भुई थोडी

दगडाच्या चुलीवर मटणही रटरटत होते आणि डोंगरकपारीला झाडाच्या आडोश्यााला दोन डोळे दिपले. ते डोळे होते बिबट्याचे!

leopard in party, leopard in sangli, leopard came for mutton party, sangli leopard suddenly came for party
आवातन नसताना बिबट्या पार्टीला; पोरांची मात्र पळता भुई थोडी (संग्रहित छायाचित्र)

सांगली : श्रावणाची अमावस्या झाली. गावातल्या आठ-दहा पोरांचा पार्टीचा बेत ठरला. ठिकाणही ठरले. तीन दगडाच्या चुलीवर मटणही रटरटत होते आणि डोंगरकपारीला झाडाच्या आडोश्यााला दोन डोळे दिपले. ते डोळे होते बिबट्याचे! पार्टीला आवतन न देता बिबट्या आल्याने पळता भुई थोडी अशी गत होऊन गाव कधी गाठले हे पार्टीच्या नादात जमलेल्या पोरांना कळलंच नाही.

वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर येथील तरूणांनी श्रावणातील सणवारामुळे मांसाहर वर्ज्य केला होता. रोजचे शाकाहारी खाऊन खाऊन कंटाळा आल्याने सामिष पार्टीचे आयोजन करण्याचे ठरले. रविवारी रात्रीच्या पार्टीसाठी जागाही डोंगरकपारीची निवडण्यात आली. पार्टीसाठी मटण, मसाला, तेल, वाटण, पाणी आणि भांड्याची व्यवस्थाही करण्यात आली. काही पोरं जेवणाच्या तयारीसाठी कडूस पडल्यापासून तळावर जमली होती. तर काही जण गावाचा कारभार आटोपून थोडासा उतारा टाकूनच येणार होती. तीन दगडाची चूल मांडली.

couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

हेही वाचा : “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवारांना लांडगा म्हणत असेल, तर…”, काँग्रेस नेत्याचं विधान

चुलीवर मटण रटरटत होतं. चुलीतून अग्निच्या ज्वाला बाहेर येत होत्या. या आगीच्या उजेडात कपारीच्या एका बाजूला असलेल्या झाडाजवळ दोन डोळे चमकले. पाहणार्‍याने मित्राला बघण्यास सांगितले. सर्वांचेच एकमत झाले की लपून पार्टीला आलेला बिबट्याच आहे. मग काय? समद्यांचीच पाचावर धारण बसली. चुलीवर शिजणारं मटण रटरटतच होतं. सगळं तिथंच टाकलं. आणि बिबट्याच्या भीतीने गावची वाट धरली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 17:48 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×