सांगली : 'जोर लगा के हैय्या' म्हणत माजी महापौरांसह राजकीय कार्यकर्त्यांनी रविवारी सांगलीत रस्त्यावर बंद पडलेल्या बसला धक्का देऊन सुरु केले. सामान्यांना आप्तस्वकियांच्या भेटीगाठी घेण्यासाठी, कामासाठी हक्काचे वाहन म्हणजे एसटी महामंडळाची लालपरी होय. रविवारी केंद्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमे दरम्यान शहरी बस कर्मवीर चौकामध्ये बंद पडली. चालकाने प्रयत्न करुनही बस सुरु होईना. हेही वाचा : “आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल, परत…”, भाजपाचा सुप्रिया सुळेंना थेट इशारा… याच ठिकाणी शहराचे माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्यासह राजकीय कार्यकर्ते स्वच्छता करीत होते. त्यांनी बंद पडलेल्या बसला धक्का मारुन बस सुरु करण्यास मदत केली. जिल्ह्यात नवीन १०० बस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र जुन्या झालेल्या बस अद्याप धावत असून बऱ्याचवेळा बस बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.