सांगली : देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयित गुन्हेगाराला खानापूर तालुक्यातील घानवट येथे अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जिवंत काडतूसांसह तीन पिस्तूल हस्तगत करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी रविवारी सांगितले.

अमोल विलास खरात (वय २९ रा. दहिवडी, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस दप्तरी गुन्हेगार अशी त्याची नोंद असून तो घानवट येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचला होता. तो आल्यानंतर पोलीसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये तीन देशी बनावटीची पिस्तुले आढळली. तसेच १० काडतुसेही आढळून आल्याने पोलीसांनी घातक हत्यारे जप्त केली आहेत. त्यांची किंमत दीड लाख रूपये आहे.

Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

हेही वाचा : ज्ञानवापी मशीद प्रकरणी राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मुस्लिम बांधवांनी मशीद…”

दरम्यान, दुचाकीवरून मोपेडला अडकवलेली बॅग लंपास करणार्‍या साहिल सलिम शेख (वय २७ रा. सांगली) याला विश्रामबाग पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील पर्स, सोन्याचे मंगळसूत्र व चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा ८५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.