सांगली : रुग्णालयातील काम आटोपून घरी जात असताना एका युवकाचा डोकीत दगड घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. खून झालेला तरुणाचे नाव मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. भेंडवडे ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आहे. तो सांगलीत एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. खून झालेल्या घटनास्थळी तरुणाची एक बाईकही आढळली आहे. संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा : “नाद करा! पण शरद पवारांचा कुठं? ते थेट..”, निलेश लंकेंचा अजित पवारांना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता. काल रात्री तो हॉस्पिटलमधून काम आटपून बाहेर पडला. त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा तपास संजय नगर पोलीस करीत आहेत. आरोपी पकडण्यासाठी इतर ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा , संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.