वाई : साताऱ्यात लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करत तीन लाखांची अफू जप्त केली. मुळीकवाडी (ता फलटण) येथे अफूची शेती करणार्‍या शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. मुळिकवाडी येथे बाचकी नावाचे शेतात सुरेश शिवराम पवार याने त्याचे मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी शेतात छापा मारला. त्याने २७३७ झाडांची लागवड करुन त्याची जोपासना करीत असताना मिळुन आला. त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकामध्ये लपवून ठेवली असल्याचे मिळून आले. त्याच्याकडे अंमली पदार्थ अफुचा एकुण रूपये पावणेतीन लाखांचा माल मिळून आला .

हेही वाचा… Maharashtra News Live : “देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी, राजीनामा द्यावा” प्रियंका चतुर्वेदींची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतची फिर्याद पोलिस कॉस्टेबल वैभव सावंत यांनी दिली असुन सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास महिला उपनिरीक्षक एस एन पवार करीत आहेत .