वाई : साताऱ्यातील छत्रपती शिवप्रभूंच्या वंशजांच्या वतीने व शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवप्रभूंच्या वंशजांच्या वतीने व तमाम शिवभक्तांच्या वतीने शिवसन्मान पुरस्कार यंदाच्या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. येत्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी १९ फेब्रुवारीला सातारा येथे भव्य दिव्य सोहळ्यात हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : एटीव्ही अपघात प्रकरणी पोलिसांची कारवाई, बापलेकांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या जागेची पाहणी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिषित बापट व इतर विभागाच्या सर्व आधिकाऱ्यांनी केली. यावेळी सुनील काटकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, विनीत पाटील व इतर सहकारी उपस्थित होते.