वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सुटी उपलब्ध केल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन दिवस ऐच्छिक सुट्या (रिस्ट्रिक्टेड हॉलिडे) घेता येतात. महाराष्ट्राबाहेर कार्यरत असलेल्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंती साजरी करता यावी म्हणून या यादीत शिवजयंतीच्या सुटीचा समावेश करावा, अशी मराठी जनतेची मागणी होती. ती मान्य करून केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या ऐच्छिक सुटीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा समावेश केला आहे.

हेही वाचा : राजकारणात येणार का? मनोज जरांगे म्हणाले, “लोकांचा समज होता की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यादीत या दिवसाचा उल्लेख चुकून ‘शिवाजी जयंती’ असा झाला असून त्याऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली. मंत्री महोदयांनी ती मान्य केली. दरम्यान, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची जबाबदारीही श्री. जितेंद्र सिंह यांच्याकडे असल्यामुळे त्या विभागाशी संबंधित अनेक विषयांवर या भेटीत चर्चा झाली. कराड तालुक्यातील हजारमाची येथे ६०० कोटी रुपये खर्चून भूकंप संशोधन केंद्र आणि भूकंप अभ्यासाचे विद्यापीठ उभारण्यात येत आहे. हा मुद्दाही या भेटीत सविस्तर चर्चिला गेला.