सोलापूर : बार्शी शहरात मंगळवारी घडलेल्या भयानक घटनेत एका शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीसह कोवळ्या मुलाचा खून करून नंतर स्वतः आत्महत्या केली. या घटनेने बार्शी शहर हादरले आहे. बार्शी शहरातील उपळाई रस्त्यावर नाईकवाडी प्लाॅटमध्ये ही घटना घडली. अतुल सुमंत मुंढे (वय ४०), तृप्ती अतुल मुंढे (वय ३५) आणि ओम (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. अतुल याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण लगेचच स्पष्ट झाले नाही. बार्शी शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरूवात केली आहे.

अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकपदावर सेवेत होते. तर त्यांच्या पत्नी तृप्ती बार्शीत अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघांना ओम नावाचा पाच वर्षांचा मुलगा होता. या शिक्षक दाम्पत्याचा संसार सुरळीतपणे चालला असतानाच अतुल याने पत्नी तृप्ती हिचा चाकूने गळा चिरून खून केला. नंतर त्याने मुलगा ओम याचा उशीने तोंड दाबून खून केला. पत्नी आणि मुलाचा खून केल्यानंतर अतुल याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा : “मीसुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, काही गोष्टी…”, तेलंगणात प्रचारासाठी गेलेल्या शिंदेंवर ठाकरेंची टीका, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतुल हा पत्नी व मुलासह घरात वरच्या मजल्यावर राहात होता. तर खालच्या मजल्यात त्याचे आई-वडील राहतात. सकाळी उशिरापर्यंत अतुल वा अन्य कोणीही खाली न आल्यामुळे आईने वर जाऊन पाहिले असता ही धक्कादायक घटना उजेडात आली.