सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारतीय क्रिकेटमधील महान व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, ‘लिटल मास्टर’ सुनील गावस्कर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील श्री नवदुर्गा माता मंदिर मध्ये देव दर्शन घेतले.
यावेळी भारताचे महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्यासह सौभाग्यवती तसेच गुंडप्पा विश्वनाथ यांनी आपल्या कुटुंबीयांसह हजेरी लावली. गावसकर आणि विश्वनाथ कुटुंबानं मनोभावे देवीची पूजा केली व भक्ती प्रकट केली.या दर्शनानंतर त्यांनी महाप्रसादाचा आस्वादही घेतला. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून जेव्हाही वेळ मिळतो, तेव्हा आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक होत असल्याचे सुनील गावस्कर यांनी यावेळी सांगितले.
क्रिकेट विश्वातील’लिटल मास्टर’ सुनील गावस्कर यांनी घेतले रेडी येथील श्री नवदुर्गा मातेचे दर्शन
भारतीय क्रिकेटमधील महान व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व, 'लिटल मास्टर' सुनील गावस्कर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील श्री नवदुर्गा माता मंदिर मध्ये देव दर्शन घेतले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-10-2025 at 20:55 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer sunil gavaskar took darshan of shri navadurga mata temple in ready kanyal vengurla taluka sud 02