केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांची निराशा करणारा आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अर्थसंकल्पात शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम बांधण्याकरिता अपेक्षित योजना नाही. माजी कृषीमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मर्यादा ६० हजार कोटीवरून सात लाख ५० हजार कोटींपर्यंत नेली होती. त्या तुलनेत या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणारी कोणतीली योजना नाही.
हा अर्थसंकल्प लाखो प्राप्तीकर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांचा  तसेच ज्येष्ठ नागरिकांचा अपेक्षाभंग करणारा आहे. पर्यटन हा मोठा उद्योग असतानाही रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने अर्थसंकल्पात  कोणत्याही भरीव योजना आखलेल्या दिसत नाहीत, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.