scorecardresearch

Premium

फडणवीस यांच्याकडेच आरक्षण देण्याची नियत; अन्य नेत्यांकडून केवळ राजकारण – शिवेंद्रराजे

मराठा समाजासोबत आजवर प्रत्येक नेत्याने केवळ मतांचे राजकारण केले आहे. या समाजास आरक्षण देण्याचे काम केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच केले.

fadanvis shivendra raje
देवेंद्र फडणवीस, शिवेंद्रराजे

वाई: मराठा समाजासोबत आजवर प्रत्येक नेत्याने केवळ मतांचे राजकारण केले आहे. या समाजास आरक्षण देण्याचे काम केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच केले. तशी नियत केवळ याच नेत्याकडे आहे. त्यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले, जे पुढे आघाडीच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. यापुढेही मराठा समाजाला आरक्षण फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात.

दुसरे कोणीही नाही, असे स्पष्ट मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की मराठा समाजातील मुला-मुलींना आरक्षणाची गरज आहे. फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. पुढे हे आरक्षण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च न्यायालयात टिकवले. परंतु जे पुढे आघाडीच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही.

devendra fadnavis obc protest withdraw
ओबीसी आंदोलन मागे; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका आहे, पण…”
Chandrasekhar Bawankule apologized to Ajit Pawar
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची क्षमा मागितली, असं का केलं त्यांनी?
manoj jarange meet sambhaji bhide
Maratha reservation: जरांगेंची ताठर भूमिका; उपोषण सोडण्यासाठी पाच अटी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा आग्रह
manoj-jarange-patil-eknath-shinde
सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…”

हेही वाचा >>> सांगली: पंकजा मुंडेंच्या दौऱ्यावेळी इस्लामपुरात नियोजनाचा गोंधळ

आज जे अन्य राजकीय नेते या प्रश्नावर राजकारण करत आहेत, ते केवळ मतांसाठी सुरू आहे. यातील एकही नेता समाजासाठी, या आरक्षणासाठी काहीही करणार नाही. हे आरक्षण देताना खूप विचारपूर्वक धोरणे राबवावी लागणार आहेत. ती राबवताना त्यातील प्रामाणिकपणा आणि नियत केवळ फडणवीस यांच्याकडे आहे. अन्य नेत्यांना यावर केवळ राजकारण करत समाजाला भडकवत ठेवायचे आहे. यापुढेही हे गेलेले आरक्षण फक्त फडणवीसच देऊ शकतात. दुसरे कोणीही नाही, असे स्पष्ट मत शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Intended to give reservation only devendra fadnavis politics from other leaders shivendra singh raje ysh

First published on: 07-09-2023 at 19:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×