जालना : जालना जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारीही पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल (३२ मि.मी.) पाऊस अंबड तालुक्यात झाला. जालना, बदनापूर आणि परतूर या तालुक्यांतही चांगला पाऊस झाला.

जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यन्त सरासरी ७६० मि.मी. पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्याच्या अपेक्षित वार्षिक पावसाच्या (६०३ मि.मी.) तुलनेत १२६ टक्के आहे. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक पाऊस (९०८ मि.मी.) झाला आहे. घनसावंगी तालुक्यात झाला आहे. जालना ८०१ मि.मी., बदनापूर ७८३ मि.मी. मंठा ७०५ मि.मी., जाफराबाद ७११ मि.मी., परतूर ८०२ मि.मी., मंठा ७०५ मि.मी. आणि अंबड ७९६ मि.मी. याप्रमाणे अन्य तालुक्यांत पाऊस झालेला आहे.

अतिवृष्टीमुळे पीकांचे आणि जमिनीचे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील तसेच अन्य भागातील शेतकऱ्यांनी मंगळवारी स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन खोतकर यांनी दिले.