Premium

सांगलीत भरदिवसा ज्वेलरी दुकानावर दरोडा, ५ कोटींचे दागिने लंपास

टोळीने पिस्तुलचा धाक दाखवत, कर्मचाऱ्यांना बांधून भरदिवसा ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रकार सांगली मार्केट यार्डजवळ घडला.

Jewellery shop robbed
रिलायन्स ज्वेल्स या नावाचे तयार दागिने विक्रीचे दुकान मुख्य सांगली-मिरज मार्गावर आहे.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली: सुवर्णालंकार खरेदीसाठी ग्राहक म्हणून आलेल्या टोळीने पिस्तुलचा धाक दाखवत, कर्मचाऱ्यांना बांधून भरदिवसा ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रकार सांगली मार्केट यार्डजवळ घडला. कोट्यावधीचे दागिने दरोडेखोरांनी लंपास केले.

रिलायन्स ज्वेल्स या नावाचे तयार दागिने विक्रीचे दुकान मुख्य सांगली-मिरज मार्गावर आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ग्राहक म्हणून दुकानात आलेल्या पाच ते आठ लोकांनी पिस्तुलाचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना बांधले. ओरडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावून धमकावत अख्खे दुकान साफ केले. शोकेसमधील सर्व दागिने लंपास केले. व्यवस्थापकाला मारहाण केली. या दरम्यान अन्य एक ग्राहक पळून जात असताना त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. तो बचावला मात्र, रेलिंगवरुन पडल्याने जखमी झाला.

आणखी वाचा-नियम झुगारून प्रेक्षकांवर जाहिरातींचा भडीमार! दूरचित्रवाहिन्यांना जाहिरातींसाठी दर तासाला केवळ १० मिनिटे वेळ

या प्रकाराने सांगली हादरली असून पोलीस अधिक्षक बसवराज तेली, उप अधिक्षक आण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, विश्रामबाग ठाण्याचे पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली असून चोरीस गेलेल्या दागिण्याची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jewellery shop robbed in broad daylight in sangli mrj

Live Express Adda With MoS Rajeev Chandrasekhar

संबंधित बातम्या