scorecardresearch

Premium

“शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगणाऱ्यांची लायकी काय?” जितेंद्र आव्हाडांचं धनंजय मुंडेवर टीकास्र

“हातवारे करून शायरी म्हणायला मजा येते. पण…”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंना सुनावलं आहे.

jitendra awhad sharad pawar dhananjay munde
धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेरो-शायरीच्या माध्यमातून टीका केली होती. याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला लावणाऱ्यांची लायकी काय? असं टीकास्र जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सोडलं आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“मेरी कोई खता तो साबीत कर, बुरे है तो बरा साबीत कर, तुझे चाहा है, कितना तू क्या जाने, चल हम बेवाफा ही सही, तू अपनी वफा तो साबीत कर,” असा थेट हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला होता.

jitendra awhad dhananjay munde
“गद्दारी रक्तात असलेल्यांना…”, शरद पवारांपाठोपाठ आव्हाडांचीही धनंजय मुंडेंवर टीका; म्हणाले, “तुमची लायकी…”
Sharad pawar slams dhananjay munde on jitendra Awhad
‘जितेंद्र आव्हाडांमुळे पवार कुटुंबात फूट’, धनंजय मुंडे यांच्या आरोपाला शरद पवारांचे प्रत्युत्तर
ajit pawar jitendra awhad (1)
“संसदेत भाषणाची वेळ आली की अजित पवार बाथरूममध्ये जाऊन…”, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
Santosh Banga
“संतोष बांगर महात्मा आहेत?” ‘तो’ व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सवाल; म्हणाले, “लहानग्यांचा राजकारणासाठी वापर…”

हेही वाचा : “विखे-पाटलांबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात प्रवेश करणार होत्या, पण…”, रवी राणांचा मोठा दावा

यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शायरीच्या माध्यमातून शरद पवार यांना आव्हान देण्यात आलं की, तुम्ही इमानदार आहात, हे सिद्ध करा. यांना शायरी किती समजते, हे मला माहिती नाही. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगण्याएवढी तुमची लायकी आहे का?”

“हातवारे करून शायरी म्हणायला मजा येते. पण, शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला महाराष्ट्र पडला आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

हेही वाचा : VIDEO : “देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना जरांगे-पाटलांकडे पाठवलं असेल, तर…”, जयंत पाटलांचा टोला

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी कोल्हापूरात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. “एकीकडं लोकशाही आणि स्वाभिमानाची ग्वाही द्यायची. ज्यांनी तुमच्याबरोबर हयात घालवली त्यांच्यावर बोलायचं. तुम्ही जीव द्यायला लावला असता, तर दिला असता. पण, काही जणांचे मतदारसंघ सांभाळायचे म्हणून असा दुर्दैवी निर्णय घेतला,” अशी टीका धनंजय मुंडेंनी शरद पवार यांच्यावर केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad attacks dhananjay munde over sharad pawar shayari kolhapur ssa

First published on: 12-09-2023 at 21:59 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×