देशात भगवान शंकराची १२ ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग म्हणजेच पुण्यातल्या भीमाशंकर मंदिरावरून सध्या वाद सुरू झाला आहे. कारण ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने दावा केला आहे. भाजपाशासित आसाम सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे की १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाशासित आसाम सरकारची जाहिरात पाहिल्यानंतर राज्यातले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतापले आहेत. त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, कांग्रेस नेते सचिन सावंत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन ट्वीट केले आहेत. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा करून महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या श्रद्धेवर घाव घातला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांवर अधिकार सांगणे पाहिलं होतं. पण महाराष्ट्रातील श्रद्धास्थानावरही दावा इतर राज्ये करू लागली आहेत. हे महाराष्ट्राच्या कमकुवत पणाचे लक्षण तर नाही ना?”

हे ही वाचा >> “ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?” भाजपाचा सुप्रिया सुळेंना सवाल!

आव्हाडांचा तिखट सवाल?

आव्हाड यांनी म्हटलं आहे की, “हे आमचे श्रद्धेचे स्थान आहे. त्यामुळे सरकारने १२ कोटी जनतेच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले पाहिजे. आता पौराणिक कथा देखील राजकारणाचा भाग होऊ लागल्या आहेत.” आव्हाड एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी “कामख्या देवी महाराष्ट्रात आहे का सांगू नये?” असा सवाल देखील केला आहे. हा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. कारण शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे आणि इतर ४० आमदार आसाममधलं प्रसिद्ध शहर गुवाहाटी येथे लपून बसले होते. तिथे या आमदारांनी कामाख्या देवीची पूजादेखील केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad slams eknath shinde over assam bjp govt claims on bhimashankar jyotirlinga asc
First published on: 15-02-2023 at 11:24 IST