कराड : काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत केलेल्या विधानावरून त्यांच्या विरोधात शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात शिवसेना (शिंदे गट) युवासेनेने आंदोलन केले. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, हे आंदोलन शांततेत पार पडले.
‘सनातनी दहशतवाद’ असा उल्लेख करून पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या विचारसरणीचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. चव्हाणांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेत, ‘हिंदुत्व आमचा अभिमान आहे’, ‘हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही’, अशा घोषणांनी अवघा दत्त चौक परिसर दणाणून सोडला होता.
युवासेनेचे संभाजी पाटील आणि जिल्हा संघटक राजू केंजळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यात अशा प्रकारचे विधान केल्यास त्यांच्या सभास्थळी चहुबाजूंनी भगवे झेंडे लावले जातील. आम्ही शांततेत आंदोलन केले असले, तरी युवासेना अशा विधानांचा तीव्र विरोध करत राहील, असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला. या आंदोलनात सातारा जिल्हा विद्यार्थी सेना प्रमुख संभाजी पाटील, युवासेना उपजिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, कराड उत्तर युवासेना उपजिल्हाप्रमुख ऋषिकेश पिसाळ, उपजिल्हाप्रमुख रत्नदीप जाधव, माण तालुकाध्यक्ष हेमंत राजगे, सातारा तालुकाप्रमुख सुरज जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘सनातनी दहशतवाद’ असा उल्लेख करून पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या विचारसरणीचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. चव्हाणांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेत, ‘हिंदुत्व आमचा अभिमान आहे’, ‘हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही’, अशा घोषणांनी अवघा दत्त चौक परिसर दणाणून सोडला होता.
‘हिंदुत्व हा आमचा अभिमान असून, त्याविरुद्ध कुणीही अपमानास्पद विधान केल्यास त्याचा तीव्र विरोध केला जाईल. सनातन धर्म आणि भगव्या विचारांची बदनामी सहन केली जाणार नसल्याचे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.