साताऱ्यासह १५ गावांना पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्णपणे भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात व कास परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव पूर्णपणे भरला आहे. याशिवाय तालुक्यातील छोटे-मोठे तलाव भरत आले असून ओढे, नाले दुथडी भरुन वाहत आहेत . महाबळेश्वर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

साताऱ्यासह महाबळेश्वर,पाचगणी, वाई, कास पठार, जावली परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.  सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात व कास परिसरात मागील काही दिवसात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्णपणे भरला आहे.  कास तलावातून जाणारे पाणी पुढे वजराई धबधब्यात जाणार असल्याने भांबवली वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने वाहणार आहे.

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

मागील तीन वर्षांपासून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरु आहे. यावर्षीही हे धरणाचे काम पूर्ण न झाल्याने पाणीसाठा व साठवण क्षमता जैसै थे राहणार आहे. यावर्षी सातत्याने होत असलेल्या पावसाने कासची पाणीपातळी मे महिन्यात ही समाधानकारक होती.  हा तलाव ब्रिटीश कालीन आहे. या तलावातून साता-यासह नजीकच्या १५ गावांना पिण्याचे पाणी पूरविले जाते. हा तलाव सन १८८५ मध्ये बांधण्यात आला. याची क्षमता १०७ दक्षलक्ष घनफूट इतकी आहे. कास धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या भितींची उंची १२.३६ मीटर वाढणार आहे. तर, पाणी साठ्याची क्षमता वाढणार असल्याने सातारकरांचा भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे उरमाेडी धरण विभागाचे शाखा अभियंता अरिफ माेमीन यांनी लोकसत्ता’ला सांगितले.

महाबळेश्वर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले अ सून आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजेपर्यंत सातारा ४१.४मिमी, महाबळेश्वर येथे ११८.६मिमी, पाचगणी ७५.२मिमी, तापोळा १३८.४मिमी, लामज १४५.१ मिमी तर वाई ३९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना, धोम व धोम बलकवडी,नागेवाडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे.